रिपब्लिकन युवक आघाडी ठाणे शहर विनोद भालेराव यांचे नेतृत्वाखाली सौरव आढांगळे यांनी दिवा येथे आंदोलन पार पाडले


ठाणे:-
नवि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटिल यांचे नाव देण्यात यावे यासाठी आज ठाणे जिल्हा मध्ये साखळी आंदोलन भुमीपुत्र आगरी-कोळी समाजाकडून करण्यात आले.या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी जाहीर केला होता. त्यांचे आदेशाचे पालन करत ठाणे जिल्हा युवक विनोद भालेराव यांचे नेतृत्वाखाली दिवा येथे रिपब्लिकन युवक सौरव आढांगळे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. नवि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दि.बा.पाटिल यांचेच नाव मिळावे अशी भुमिका रिपब्लिकन पक्षाची सुद्धा आहे असे सांगण्यात आले. व या पुढील सिडको भवन ला घेराव घालण्यासाठी समस्त रिपब्लिकन युवक रस्त्यावर उतरतील असे विनोद भालेराव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area