देवांग समाज व चौडेश्वरी युवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

श्री देवांग समाज रजि. इचलकरंजी आणि चौंडेश्वरी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवांग समाज इचलकरंजी यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान (blood donation) शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये समाजातील युवक व युवतींनी रक्तदान शिबिरामधे सहभाग घेतला गत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरणा सारख्या महाभयंकर संकटाला शहरातील सर्व नागरिक अत्यंत जिद्दीने तोंड देत आहे अशावेळी सामाजिक संस्थांनी फार मोठ्या प्रमाणात मोलाचा हातभार लावला आहे.

त्यामध्ये देवांग समाज चौंडेश्वरी युवा फाउंडेशन हे सुद्धा अगदी हिरीरीने सहभागी होत आहे गेल्या महिन्यामध्ये सलग दहा दिवस सुरू असलेल्या चौंडेश्वरी अन्नछत्र सेवा या योजनेअंतर्गत निराधार गरजू लोकांना घरपोच मोफत जेवणाची सोय केली तसेच देवांग समाज यांच्या 75व्या अमृतमहोत्सवानिमित्त आज चौंडेश्वरी मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते जेणेकरून कोरणा सारख्या तसेच इतर आजारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांना रक्ताचा तुटवडा भासू नये व त्यांचा जीव वाचावा हीच एक प्रेमळ भावना या उदात्त हेतूने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले अशावेळी विशेष म्हणजे युवतींचा ही प्रामुख्याने सहभाग दिसून आला.

रक्तदान शिबिरासाठी (blood donation) मा खासदार राजु शेट्टी विठ्ठल डाके स्वप्नील आवाडे तानाजी पोवार विठ्ठल चोपडे तौफिक मुजावर इम्रान मकानदार मनोज हिंगमिरे रामदास कोळी सुनिल सांगले धुव्रती दळवाई मीना बेडगे पल्लवी साखरे निर्भया पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पोवार आदि उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

आजच्या रक्तदान शिबिरामधे युवक युवती मिळुन 135 जणांनी रक्तदान केले.यावेळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे राजेंद्र सांगले संजय दादा कांबळे आनंदराव साखरे मधुकर वरुटे मोहन सातपुते मुरलीधर निमणकर प्रकाश सातपुते महेश सातपुते तसेच चौंडेश्वरी युवा फाउंडेशन अध्यक्ष प्रमोद मुसळे मा.अध्यक्ष प्रशांत सपाटे सदस्य सचिन नाकील विजय मुसळे भाऊसो साखरे संदीप हावळ अमोल डाके रविराज बुगड सुभाष हावळ नंदकुमार टेके सचिन भरते मनोज खेतमर प्रतीक बुगड संजय सातपुते रोहन कांबळे म्हाळसाकांत कवडे अमित ढवळे सुनील म्हेतर प्रदीप धोत्रे महिला प्रतिनिधी प्रीती बुगड संगीता धुत्रे शर्मिष्ठा फाटक दिपा ढवळे वैष्णवी ढवळे माया सातपुते स्मिता बुगड तसेच सर्व नवनियुक्त वार्ड समिती सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area