सैफ-करीनाच्या दुसऱ्या लेकाला भेटायला पोहोचली सारा आली खान, तैमूरच्या भावाला बघून म्हणाली…

 मुंबई : बॉलिवूडचा ‘नवाब’ अर्थात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांच्या दुसऱ्या चिमुकल्या लेकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. तथापि, यावेळी दोन्ही कलाकारांनी निर्णय घेतला आहे की, ते आपल्या या मुलाला माध्यमांच्या चर्चेपासून नेहमीच दूर ठेवतील. नुकतीच सारा अली खान (Sara Ali Khan), करीना आणि सैफच्या धाकट्या मुलाला भेटण्यासाठी आली होती. एका मुलाखतीत साराने या भेटीबद्दल आणि लहान भावाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. सारा म्हणते की, तिचा लहानगा भाऊ तैमूरसारखाच खूप गोंडस आहे (Bollywood Actress Sara Ali Khan Meets taimur’s younger brother).न्यूज 18शी बोलताना सारा तिच्या भावाला भेटण्याविषयी म्हणाली की, ‘त्याने मला पाहिले आणि स्मितहास्य केले. मी तिथेच विरघळले.’ सारा पुढे म्हणाली की, तिचा धाकटा भाऊ खूपच गोंडस आहे. सैफच्या चौथ्या मुलाच्या जन्माबद्दल बोलताना सारा विनोदीपणे म्हणाली की, त्यांनी वयाच्या दर दशकात पितृत्व उपभोगले आहे. सारा म्हणाली, ‘मी पापाला नेहमी म्हणते की, तुम्ही दर दशकात म्हजे 20, 30, 40 आणि आता 50मध्येही वडील बनला आहात. तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला पितृत्वाचे 4 वेगवेगळे अवतार पाहता आले.’

या बाळाने आनंद आणला!

सारा म्हणाली की, ‘या बाळाने करीना आणि सैफच्या आयुष्यात अधिक आनंद आणि उत्साह आणला आहे. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे’. जेव्हा सैफ आणि करीना मुलाला दवाखान्यातून घरी घेऊन आले, तेव्हा सारा तिचा धाकटा भाऊ इब्राहीम त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊन आले होते. तैमूरचा जन्म झाला तेव्हासुध्दा सारा त्याची तोंडभरून स्तुती करत असे. अगदी प्रत्येक मुलाखतीत ती तैमूरबद्दल काहीना काही चर्चा करायची.

बाळाला मीडियापासून दूर ठेवणार!

‘मदर्स डे’ निमित्त करीनाने मुलाचा फोटो शेअर केला होता, परंतु त्यावेळेस देखील तिने आपला चेहरा लपवला होता. वास्तविक, तैमूरला सुरुवातीपासूनच बरीच लाइमलाईट मिळाली आहे. इतकेच नाही तर, तैमूर सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे. तो जिथे जिथे जात असे, तेथे पापराझी त्याचे फोटोंवर फोटो क्लिक करायचे. बर्‍याच वेळा तैमूरसुद्धा या गोष्टींमुळे अस्वस्थ व्हायचा, पण आता त्याला त्याची सवय होऊ लागली आहे. यामुळेच करीना आणि सैफने ठरवले की, ते आपल्या दुसऱ्या मुलाला या चर्चेपासून दूर ठेवतील.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area