Breaking- कोल्‍हापुरात उद्या चक्‍का जाम….

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्‍वाखाली कोल्‍हापुरातील राजर्षी शाहू समाधी परिसरात मूक आंदोलन करण्यात आले (local news)  होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजबांधवांना अत्यावश्यक असणार्‍या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारकडून होणार्‍या निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल अशी भूमीका संभाजीराजे यांनी मांडली होती.

यानंतर राज्‍य सरकारकडून सकल मराठा समाजाच्या प्रमुख सात मागण्या गतीने सोडविण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले होते. मात्र, त्‍यावर अंतिम निर्णय होईपर्यंत मूक आंदोलन सुरू ठेवण्याच निर्णय खासदार संभाजीराजे यांनी जाहीर केला होता.

दरम्‍यान सकल मराठा समाज कोल्‍हापूर जिल्‍हा यांच्या वतीने छत्रपती ताराराणी चौक कावळा नाका येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी उद्या (मंगळवार) सकाळी १० वाजता चक्का जाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले (local news)  आहे.

कोल्हापुरात सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने सरकारचा निषेध करण्यासाठी चक्‍का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या चक्‍का जाम आंदोलनात सर्व मराठा बांधवांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी व्हावे आणि राज्‍य सरकारचा कडकडीत विरोध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्‍यान आज नाशिक मध्ये मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची पुढील दिशा आज संध्याकाळी ठरवणार असल्‍याचे सांगितले. आजच्या आंदोलनाला राष्‍ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे उपस्‍थित होते. त्‍यांनी मराठा आंदोलनाला आपला पांठिंबा जाहीर केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area