Video | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच

                                            

 सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे लग्न समारंभातील असतात. सध्या अशाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नवी नवरी तिच्या लग्नात चक्क पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. (Bride eating Golgappa Panipuri in marriage video went viral on social media)

नवरीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांकडून प्रशंसा

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अतिशय आकर्षक असा मेकअप केलेली नवरी दिसत आहे. या नवरीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या गळ्यात लाल रंगाची वरमालासुद्धा आहे. तिचा हा साज पाहून नेटकरी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. यावेळी ही नवरी खुर्चीवर शांतपणे फक्त बसलेली नाही तर ती मस्तपैकी पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे.

नवरीकडून बिनधास्तपणे पाणीपुरीचा आस्वाद

तिच्यासमोर एका माणसाचे पाणीपुरीची प्लेट धरलेली आहे. या प्लेटमधून ही नवरी एक-एक पाणीपुरी उचलून खात आहे. पाणीपुरीचा आस्वाद घेताना तिला कसलीही चिंता नसल्याचे दिसतेय. लग्नविधी सुरु आहे, समोर लोक असतील, अशा परिस्थितीमध्ये आपण पाणीपुरी कशी खावी ? असे कोणतेही प्रश्न या नवरीला पडत नाहीयेत. आपल्याच धुंदीमध्ये ही नवरी पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे.

नवरदेव विधी पार पाडण्यात गुंतला

व्हायरल होत असलेल्या बहुतांश व्हिडीओंमध्ये नवरी तसेच नवरदेव असतात. मात्र, या व्हिडीओमध्ये आपल्याला फक्त नवरीच दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव हा लग्न विधी पार पाडण्यात गुंतलेला आहे. हीच वेळ साधत नवरीने पाणीपुरीवर ताव मारला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला wed.vows या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत असून लाईकही करत आहेत.

click below link to watch video

https://www.instagram.com/wed.vows/?utm_source=ig_embed&ig_rid=03e5bc26-7020-4423-9feb-5605195e982f

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area