लसीकरण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नाही, भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात – उदय सामंत

 

जालना : लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नसल्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते. त्याचबरोबर 3 हजार 74 पदांची भरती पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचंही उदय सामंत म्हणाले. ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं. संवर्गानुसार भरती करायची असेल तर आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांनी निर्णय कळवल्यास त्यानुसार भारती करण्यास तयार असल्याचंही उदय सामंत म्हणाले. संस्थांच्या रोस्टर पद्धतीने निर्णय घेतला तर भरती प्रक्रिया लांबली जाऊ शकते, अशी शक्यताही सामंत यांनी व्यक्त केलीय. (Colleges cannot be started until the vaccination process is complete)

कोरोनामुळे अनाथ झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या आई, वडील अथवा पालकांचा मृत्यू झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचे पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतीगृहाचा उपयोग केला जात नसल्याने वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येईल.

विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही, परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area