Covid 19 Guidelines : मुलांना मास्कची गरज नाही, रेमडेसिव्हीरही अजिबात नको

Covid 19 Guidelines : केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये असं या गाईडलाईन्समध्ये निक्षूण सांगितलं आहे. (Covid 19 new Guidelines for children, Masks not needed for children below 5 years discourages Remdesivir)

सौम्य लक्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांच्या आसपास असू शकते. याशिवाय घशात खवखव, श्वास घेताना, खोकताना त्रास जाणावणे यांचा समावेश आहे. शिवाय ताप असेल तर पॅरासिटामोल गोळी देताना 4-6 तासांचं अंतर ठेवा. खोकल्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करा. विलगीकरणात गेलेल्या मुलांशी पालकांनी सकारात्मक चर्चा करावी. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मुलांना 6 मिनिट वॉक टेस्ट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

मुलांना मास्कची आवश्कता नाही

नव्या गाईडलाईन्सनुसार, 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नाही. तर 6-11 वर्षाच्या मुलांनी आई-वडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावू शकतात. तसंच 12 वर्षावरील मुलं मास्क वापरु शकतात.

स्टिरॉईडवर नियंत्रण

केंद्राच्या नव्या नियमानुसार, मुलांना उपचारादरम्यान स्टिरॉईड न देण्याचा सल्ला दिला आहे. स्टिरॉईट केवळ अत्यावश्यक, गंभीर स्थितीत असलेल्याच मुलांना आवश्यकतेनुसार द्यावे. तसंच योग्य काळासाठीच अशी औषधं दिली जातील याचं भान ठेवावं, असाही सल्ला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area