“अजित पवारांकडे जरासुद्धा माणुसकी नाही…”

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. सेवेत सामावून घेण्याचं निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्याने करोना काळातील कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी (health worker) संतप्त होऊन थेट अजित पवार यांचा ताफाच अडवण्याचा प्रयत्न (politics news) केला.यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असता दोन महिला कर्मचारी (health worker) जखमी झाल्या.या घटनेवरून भाजपा नेत्यांनी टीका केली असून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांकडे माणुसकीसुद्धा नसल्याचं म्हटलं आहे.


निलेश राणे यांनी ट्वीट (twitter post) करत आपला संताप व्यक्त केला आहे. “बीडमध्ये उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना काय वागणूक मिळाली बघा,” असं सांगत निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला (politics news) आहे.

नोकरी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढले हे सरकारच्या अकार्यक्षमतेचेच प्रतीक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून राज्यभर आंदोलन उभे करावे. आपण सर्व सहकार्य करू,” अशी ग्वाहीही आमदार धस यांनी दिली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area