‘राज साहेब राजा माणूस आहेत’, दिग्दर्शक केदार शिंदेंकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चित्रपट-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मैत्री करावी तर या राजा माणसाशी..’ असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आहे (Director Kedar Shinde share  Happy Birthday Post for MNS Chief Raj Thackeray).काय म्हणाले केदार शिंदे?

‘राजसाहेब…..ते राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो… तो राजा माणूस आहे.. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे… संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला  त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही.. मैत्री करावी तर या राजा माणसाशी.. सतत लक्ष असतं त्यांचं.. सतत संपर्कात असतात.. वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत… या कोरोनाच्या कठिण परीस्थिती मधे हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही.. हे आपल्याला सतत जाणवलय..मान्य करायालाच हवं…’

‘एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही.. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली.. काहींना  न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली… एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ.. नक्कीच आपल्यावर “राज्य” येणार नाही, याची ते काळजी घेतील..आज त्यांचा वाढदिवस आहे.. त्यानिमित्ताने हे गीफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ.. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करतील..’, अशी खास पोस्ट केदार शिंदेनी लिहिली आहे.

राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

“सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. राज्यात एका दिवसात 12,207 रुग्ण सापडले आहेत. तर दीड लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा” असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं.

राज ठाकरे यांच्या पत्रात काय?

“दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो.तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल 12,207 नवे रुग्ण सापडले आणि 1,64,743 जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.” असं पत्र राज ठाकरे यांनी शेअर केलं होतं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area