संतापजनक ! पैशांसाठी सासऱ्याने सूनेला चक्क 80 हजारात विकलं, मुलाला माहिती पडलं आणि….

 

लखनऊ : एखादी मुलगी जेव्हा तिचे आई-वडील, घरदार सोडून सासरी येते तेव्हा तिला नेमकी काय अपेक्षा असेल? आई-वडिलांनी जेवढं प्रेम दिलं तितकच प्रेम सासरच्यांनी द्यावं. प्रेम सोडा, निदान चांगली वागणूक द्यावी, चांगली भावना ठेवावी, इतकीच काय तिची माफक अपेक्षा असू शकते. मात्र, काही लोक प्रेम तर नाहीच देऊ शकत पण आपल्या मुलीच्या वयाच्या सूनेबाबत विकृत विचार करतात. अशा लोकांना समाज आणि नियती नक्की शिक्षा देते. त्यांना त्यांच्या वागणुकीचे नक्कीच परिणाम भोगावे लागतात. कारण अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊत समोर आलीय. एका नराधम सासऱ्याने आपल्या सूनेला चक्क 80 हजारात विकण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने मुलाने योग्य पाऊल उचलल्याने मोठा अनर्थ टळला (Father-in-law sold woman in 80 thousand rupees).

मुलाचा प्रेमविवाह

संबंधित घटना ही लखनऊच्या बाराबंकी येथील मल्लापूर गावात घडली आहे. गावातील रहिवासी चंद्रराम वर्मा याचा मुलगा प्रिंसचं 2019 मध्ये आसामच्या एका मुलीशी लग्न झालं होतं. प्रिंसचा प्रेमविवाह झाला होता. दोघांची भेट एका ऑनलाईन अॅपवर झाली होती. लग्नानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. प्रिंस लग्नानंतर आपल्या पत्नीसोबत गाझियाबादला राहण्यासाठी गेला. तिथे तो टॅक्सीचालक म्हणून काम करायचा (Father-in-law sold woman in 80 thousand rupees).

आरोपी सासऱ्याचा 80 हजारात सूनेला विकण्याचा सौदा

प्रिंसचा वडील चंद्रराम याने पैशांच्या लोभापाई आपल्या सूनेला विकण्याचा विचार केला. यासाठी त्याने मुलाकडे काहीतरी कारण सांगून सूनेला गाझियाबादेतून बोलावून घेतलं. त्याची सून 4 जूनला घरी आली. त्यानंतर सासऱ्याने रामू गौतम नावाच्या दलालासोबत कट आखला. रामू गौतम याने गुजरातचा तरुण साहिल आणि त्याच्या कुटुंबियांना बाराबंकी येथे बोलावलं. त्यानंतर दोघी पक्षांची चर्चा झाली. चर्चेअंती 80 हजारात सौदा झाला. आरोपी सासऱ्याने 80 हजारात सूनेला विकण्याचा सौदा केला.

वडिलाच्या कटाचा प्रिंसला माहिती मिळाली

सुदैवाने चंद्ररामच्या घाणेरड्या कटाची माहिती अखेर प्रिंसला मिळाली. प्रिंसच्या पाहुण्याने त्याला याबाबत कल्पना दिली. तो तातडीने बाराबंकी येथे आला. तो घरी आला तेव्हा त्याची पत्नी आणि त्याचे वडील चंद्रराम दोघी घरात नव्हते. त्याने वेळ न दडवता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने संबंधित प्रकरणाची पोलिसांना सविस्तर माहिती दिली.

आरोपींना अखेर बेड्या, सूनेची सुटका

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य जाणून तातडीने कारवाईला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार एक पथक महिलेच्या शोधासाठी निघाले. अखेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर महिला सापडली. पोलिसांनी महिलेसोबत असणाऱ्या आठ जणांना अटक केली. यामध्ये सासऱ्याचा देखील समावेश आहे. आरोपी सासरा गुजरातमधून आलेल्या तरुणासोबत सूनेचं लग्न लावणार होता. विशेष म्हणजे संबंधित तरुण तिला गाझियाबादला घेऊन जाणार असल्याची खोटी माहिती देवून तो तिला रेल्वे स्टेशनला घेऊन आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area