Video | महिला पोलिसाची अरेरावी, कोरोना नियम मोडून म्हणते “होमगार्ड आहेस, होमगार्डसारखे राहा..”

 

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली असली तरी अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. पुणे, मुंबईसारख्या जिल्ह्यांमध्ये तर अजूनही नियमांमध्ये म्हणावी तेवढी शिथीलता लागू करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मात्र, त्यापेक्षाही जास्त त्रास पोलीस आणि होमगार्ड्सना त्रास होतोय. कोरोना नियम मोडूनसुद्धा लोक त्यांच्याशी हुज्जात घालत आहेत. तसे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, यावेळी एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अत्यंत महागड्या गाडीत बसलेल्या एका महिलेने कारोना नियमांचे उल्लंघन केले आहे. ही महिला पोलीस असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महिलेने होमगार्ड जवानाशी अत्यंत उर्मट भाषेत संभाषण केले आहे. (female police broken corona rules and have dispute with home guard in pune video went viral on social media)महिला महागड्या कारमधून आली

मिळालेल्या माहितीनुसार घडलेला हा प्रकार पुण्यातील दांडेकर पुलाच्या परिसरातील आहे. दांडेकर पूल परिसरात लोकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी असते. याच कारणामुळे या ठिकाणी होमगार्ड्सना बंदोबस्तावर ठेवण्यात आले आहे. होमगार्ड बंदोबस्तावर असताना याच पुलावरुन प्रवास करण्यासाठी एका महागड्या कारमधून ही महिला आली.

होमगार्डला थेट आरेतुरेची भाषा

सध्या कारमधून चार जणांना सोबत प्रवास करण्याची परवानगी नाही. तरीदेखील या महिलेच्या कारमध्ये एकूण चार प्रवासी बससेले होते. त्याबद्दल विचारणा केली असता कारमधील कथित महिला पोलिसाने होमगार्डशी वाद घालणे सुरु केले. या महिला पोलिसाने अपमानकारक भाषा वापरत होमगार्डला थेट आरेतुरे केले. तसेच ‘खाकी ड्रेस घातला म्हणजे काय पोलीस झाला का ? होमगार्ड आहेस, होमगार्डसारखेच राहा’ अशा शब्दात या महिला पोलिसाने आगपाखड केली.

पोलीस असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितले

तसेच पुढे बोलताना या महिलेने मला तुझे काम काय आहे, हे माहिती आहे. चौकात उभे राहून मी रोज तेच करते, असे म्हणत स्वत: पोलीस असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. नंतर होमगार्डने या महिला पोलिसाला खाली उतरण्याचे सांगितल्यांतरही ही महिला ऐकत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओ जुना असल्याचा काही लोकांचा दावा

दरम्यान, हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर या महिलेने माफी मागितल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या महिलेने वापरलेले शब्द आणि होमगार्डसोबत केलेले वर्तन असभ्यपणाचे असून तिच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या महिला पोलिसाचे नाव समजू शकलेले नाही. हा व्हिडीओ जुना असून तो सोशल मीडियावर नव्याने फिरतोय, असासुद्धा दावा काही लोक करत आहेत.

click below to watch video

https://twitter.com/i/status/1406320281891708929

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area