नांदेड : नोकरीच्या आमिषाने फसवणारी टोळी अखेर गजांआड

नांदेड : रेल्वेसह वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून, तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणातील तरुणांना फसवल्याचे समोर आले आहे.

रवींद्र दयानिधी संकुवार (वय ४६, रा. ओडिशा), नरेंद्र विष्णूदेव प्रसाद (वय ५५, रा. महू, उत्तर प्रदेश), सतीश तुळशीराम हंकारे (बोरगाव, ता. लोहा, जि. नांदेड), आनंद पांडुरंग कांबळे (रा. अहमदपूर, जि. लातूर) गौतम फणसे (अंबरनाथ, जि. ठाणे) आणि अभय टाणे (रा. दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील संतोष बनवारीलाल सरोज याने वसमत येथील एका तरुणाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्या तरुणाकडून टप्प्याटप्प्याने दहा लाख रुपये घेण्यात आले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना, प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे हिंगोलीचे पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त एसपी यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या लक्षात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area