Gold Price: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या आजचा दर

मुंबई: गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर सोन्याचा भाव पुन्हा एकदा वधारला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर  (Gold rates) साधारण 100 रुपयांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. काल सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला होता. मात्र, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. MCX वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला होता. तर या महिन्याच्या सुरुवातीलाही सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली होती. (Gold Price increases in MCX)

देशभरात 16 जुनपासून हॉलमार्किंग अनिवार्य

देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफ व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area