Video | व्हिडीओ शूटिंग करायला पाण्यात उतरले, अचानक पाणघोड्याकडून थरारक पाठलाग

 काही प्राणी हे दिसायला आकर्षक आणि लोभस असतात. तर काही प्राणी हे अतिशय हिंस्र म्हणून ओळखले जातात. वाघ, सिंह कोल्हा त्यापैकीची काही उदाहरणं. मात्र, यामध्येच पाणघोडा हा असा एक प्राणी आहे जो दिसायला शांत दिसतो. मात्र, त्याला एकदा राग आला की परिस्थिती गंभीर होऊन बसते. त्याची प्रचिती एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून आली आहे. हा पाणघोडा एका बोटीचा थरारकपणे पाठलाग करतो आहे. बोटीमध्ये बसलेल्यांवर हल्ला करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतोय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Hippopotamus chases speed Boat video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. प्राणी आणि पक्ष्याचे व्हिडीओ लोक आवडीने पाहत असल्यामुळे ते काही क्षणात व्हायरलसुद्धा होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुधा रामेन यांनी शेअर केला असून तो एका पाणघोड्याचा आहे. हा व्हिडीओ झांबिया येथील असल्याचे सांगितले जात आहे.

पानघोड्याकडून बोटीचा पाठलाग

या व्हिडीओमध्ये पाणघोडा अतिशय रागात असल्याचे दिसतेय. तो समोर असलेल्या बोटीचा पाठलाग करतोय. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीतील लोक पाणघोड्याची शुटिंग करण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, यावेळी पाणघोड्याने त्यांना पाहिले आणि त्याने थेट त्यांचा पाठलाग सुरु केला.

https://twitter.com/i/status/1399571753865670664

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area