इचलकरंजीत दुकाने पाच दिवस बंदच…

 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी इचलकरंजी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. पण याने व्यापाऱ्यांचे (business)आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला (local news) होता.

मात्र, नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित करत दुकाने पुढील पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत दुकाने बंदच राहणार असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी (business) व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार (local news)  पडली.

संसर्ग दर कमी येऊन आपल्याला सूट दिली जाईल. त्यामुळे ७५ दिवस केलेले सहकार्य वाया जाऊ देऊ नका, असे स्पष्ट केले. आणखी पाच दिवस थांबण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area