अभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…

‘मोहब्बतें’ (mohabbatein) फेम अभिनेत्री प्रीती झांगियानी (preeti jhangiani ) आजही सर्वांच्या लक्षात आहे. तिच्या सौंदर्याने प्रीतीने सर्वांनाच स्वतःबद्दल वेड लावले. प्रीती झांगियानी हिने दक्षिणात्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. प्रीतीने बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले होते (Know about mohabbatein girl preeti jhangiani where is she now).

90च्या दशकात प्रीती अभिनेता अब्बाससमवेत प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओ ‘चुई मुई सी तुम’ मध्ये दिसली होती. हा म्युझिक अल्बम खूप गाजला. प्रीतीच्या सौंदर्याची जादू आणि या अल्बममधील गाण्यांनी सर्वांनाच भुरळ घातली. या गाण्यानंतर अभिनेत्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. पण, सध्या ही सुंदर अभिनेत्री कुठे आहे, हे जाणून घेऊया…

दाक्षिणात्य चित्रपटातून सुरूवात

म्युझिक व्हिडीओनंतर 1999मध्ये तिने तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषिक एकएक चित्रपट साईन केले. 1999मध्ये ‘मज़हिल्लू’, ‘हॅलो’ , ‘थम्मुडु’ मधून प्रीतीने या आपल्या अभिनयाची छाप पाडली. या यशानंतर प्रीती बॉलिवूडकडे वळली.बॉलिवूडमध्ये दाखवली जादू

दक्षिणेत यश मिळवल्यानंतर अभिनेत्रीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. अभिनेत्री प्रीतीला 2000मध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानचा चित्रपट ‘मोहब्बतें’मधून बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात प्रीतीची भूमिका आणि तिची कथा चाहत्यांनी चांगलीच आवडली होती. प्रीतीचा साधेपणा तिच्या चाहत्यांना खूप आवडला.

फारसे यश मिळाले नाही!

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने ‘आवारा पागल दिवाना’, ‘आन: मेन ऍट वर्क’, ‘एलओसी कारगिल’, ‘बाझः अ बर्ड इन डेंजर’, ‘अन्नर्थ’, ‘ससुख’, ‘चेहरा’, ‘चाहत – एक नशा’, ‘लव तुम्हारा’, ‘जाने होगा क्या’, ‘चांद के पार चलो’ यासारख्या बर्‍याच चित्रपटात काम केले, पण अभिनेत्रीला तिला हवं असं यश मिळालं नाही.

अभिनेत्रीचे लग्न

प्रीती झांगियानी हिचे दोन विवाह झाले आहेत. अभिनेत्रीने प्रथम चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांचे बंधू मुश्ताक खानसोबत लग्न झाले होते. काही कलानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2008 मध्ये तिने अभिनेता परवीन डबासशी लग्न केले.

संसारात रमली अभिनेत्री

लग्नानंतर आता या प्रीतीला दोन मुलगे आहेत आणि ती आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देत आहे. बरेच चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही अभिनेत्रीने जाहिराती, कार्यक्रम आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजूनही बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. ती म्हणाली, आता माझ्या अनुपस्थितीत अशी काही माणसे आहेत, जी माझी मुले जयवीर आणि देव यांची काळजी घेतात. अभिनेत्री प्रीती झांगियानी आता पूर्ण होम मेकर झाली आहे. ती सध्या वांद्रे येथे आपल्या कुटूंबासह राहते. प्रीती आता फिटनेस कॉन्शियस झाली आहे आणि ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area