#सलाम कोल्हापूरकर… पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले आभार

कोल्हापुरात (#kolhapur) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला. यामध्ये जिल्ह्याचा मृत्यूदर देशात पहिल्या स्थानावर काही दिवस होता.

परंतु कोल्हापुरकरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला धैर्याने सामोरे जात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘सलाम कोल्हापूरकर’ म्हणत कोल्हापूरकरांचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

सतेज पाटील यांनी म्‍हटलं आहे की, कोल्हापूर (#kolhapur) गेले जवळपास १५ महिने कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटाशी लढत आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस, फ्रंटलाईन वर्कर, प्रशासन या संकटाचा मुकाबला करत आहेतच; पण यांच्या सोबतीने कोल्हापुरातील काही सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवा पिढी सुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजाला मदत करत आहेत.

कोरोनाविरुद्धची लढाई सुरू राहीलच; पण या सगळ्या कोल्हापूरकरांना सलाम करायलाच हवा. त्यासाठीचा हा विनम्र प्रयत्न म्हणजे #सलाम_कोल्हापूरकर. कोरोनाच्या या लढ्यात आपला वाटा उचलणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात कोल्हापूरकरांना मनापासून सलाम..!

माझी आपणाला विनंती आहे की, आपल्या आजूबाजूला असे पडद्यामागे मागे राबणारे हात असतील तर त्यांचे कौतुक जरूर करा. आपले कृतज्ञतेचे हे शब्द या सर्वांना बळ देतील. चला सगळे मिळून ही लढाई जिंकूया, असा विश्‍वासही सतेज पाटील यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area