इवल्याशा कासवामुळे जंगलाच्या राजाची फजिती, पाणी पिताना सिंह झाला चांगलाच परेशान

                                    

 सोशल मीडियावर रोजच लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार तर काही व्हिडीओ हे थरारक असतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर विशेष पसंदी मिळते. त्यामुळेच की काय सध्या सिंहाचा आणि कासवाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इवल्याशा कासवाने एवढ्या मोठ्या सिंहाला परेशान करुन सोडलं आहे. (little Tortoise stopping Lion from drinking water video goes viral on social media)

कासवाच्या पिलामुळे सिंह चांगलाच परेशान

असं म्हणतात की सिंह हा जंगलाचा राजा असतो. त्याला पाहून इतर प्राणी हे सैरावैरा पळतात. त्याच्या वाटेला जाण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो आपल्या सर्वांनाच चकित करणारा आहे. एका कासवाच्या पिलामुळे सिंह चांगलाच परेशान झाला. त्याला हे छोटेसे कासव पाणी पिऊ देत नाहीये.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कोणत्या जंगलातील आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक सिंह तहानलेला असल्यामुळे तो पाणी पिताना दिसतोय. तो तन्मयतेने पाणी पित आहे. मात्र, याच वेळी पाण्यातून कासवाचे एक छोटेसे पिल्लू सिंहाकडे येत आहे. एवढंच नव्हे तर हे छोटेसे कासव सिंहाच्या तोंडाजवळ जाऊन त्याच्या खोड्यासुद्धा काढत आहे.

छोट्याशा कासवाकडून सिंहाला त्रास

कासवाच्या पिलाचा हा प्रताप पाहून सिंह वैतागल्याचे वाटतेय. हा सिंह कासवापासून दूर जाऊन लगेच दुसऱ्या ठिकाणी पाणी पित आहे. पण याही ठिकाणीसुद्धा कासवाचे पिल्लू आपल्याचे दिसतेय. दुसऱ्या ठिकाणीसुद्धा कासवाचे पिल्लू सिंहाला त्रास देत आहे. सिंह मात्र बिचारा गप्प बसला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area