कोल्हापूर मार्गावरील वाहतूक मार्ग बंद

 

कोल्हापूर (kolhapur Rain)जिल्ह्यात  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधारा(Rajaram dam) पाण्याखाली गेला आहे. तर आज सकाळी सात पर्यंत पंचगंगा नदीची (panchganga river)पाणीपातळी 24 फूट 5 इंच वाढली आहे. असाच पाऊस चालू राहिला तर लवकरच पंचगंगा नदी धोका पातळी पार  (local news) करेल.

चोवीस तासात तब्बल 11 फूट पाणी पातळी वाढली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर चंद्रे फाटा-शेळेवाडी मध्यभागी असलेला पर्याय रस्ता पाण्याने वाहुन गेला आहे.तरी कोल्हापुरकडे जाणाऱ्या लोकांनी निढोरी मार्गे जावे लागणार (local news) आहे.


मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात, सोयाबीन व भुईमूग पेरणी ला गती आली आहे. आज पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.

पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान ओढ्यातून किंवा पाण्याखाली गेलेल्या बंधार्‍यावरून धोकादायक रितीने वाहतूक करू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area