संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व मान्यच, त्यांच्या आंदोलनात भाजप सहभागी होणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन आंदोलनाची घोषणा केलीय. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हे आंदोलन करण्यात येईल, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असेल. त्यांच्या आंदोलनात भाजप सहभागी होणार, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. (BJP will participate in the Maratha agitation called by MP Sambhaji Raje)

छत्रपती संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्हाला मान्यच आहे कारण ते आमचे राजे आहेत, भाजपाचे नेते आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी होणारच आहोत, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केलीय. यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपतींकडून 16 जूनला मोर्चाची घोषणा

खासदार संभाजी छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली.

लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असेही संभाजी छत्रपती म्हणाले.

लसीकरणावरुन चंद्रकांतदादांचा राज्य सरकारला टोला

अजितदादा आणि उद्धवजी यांचे म्हणणे असे आहे की जनतेच्या भल्यासाठी जे जे करायचे असेल ते केंद्रानेच कमी करावे, आम्ही काहीच करणार नाही ;असे चालणार नाही. पेट्रोलचे भाव आटोक्यात आणण्यासाठी इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही त्यावरील कर कमी करावा,  अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area