निकाल लागून वर्ष, नियुक्त्यांचं काय? ‘मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार’ असे फलक घेत नाशिकमध्ये आंदोलन

 

नाशिक : स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करणाऱ्या आणि त्यात यश मिळवणाऱ्या तरुणांचा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. 2019 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल 19 जून 2020 ला लागला. त्याला आता 1 वर्षे होत आलंय, तरीही अजून या निकालात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत नियुक्तीच झालेली नाही. निवड झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्याने अखेर या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं. या ठिकाणी निवड झालेल्या तरुणांनी ‘मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार’ असा फलक हातात धरुन प्रशासनाच्या या गोंधळाचा निषेध केलाय (MPSC exam qualified candidate protest in Nashik against appointment pendency).



‘मी तहसीलदार तरीही मी बेरोजगार’ फलक घेत दिरंगाईबद्दल तरुणांकडून नाराजी व्यक्त

लोकसेवा आयोगाने 2020 या वर्षात घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांनी आज (19 जून) नाशिकच्या शासकीय विश्रामगृह परिसरात राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. ‘मी तहसीलदार तरीही मी बेरोजगार’ अशा आशयाचं फलक घेऊन त्यांनी या दिरंगाईबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

“मराठा आरक्षणाचं कारण सांगत 413 जणांच्या नियुक्ती टाळल्या”

जवळजवळ 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत या नियुक्ती सरकारने पुढे ढकलल्या, असा आरोप या तरुणांनी केलाय. मात्र सर्व निकाली लागूनही आम्हाला नियुक्ती का दिली जात नाहीये? असा सवाल हे भावी अधिकारी सरकारला विचारत आहेत.

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं नाशिकमध्ये चूल पेटवून आंदोलन

दरम्यान, वाढत्या महागाईच्या विरोधात नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पेट्रोल-डिझेल सोबतच घरगुती गॅसचे देखील भाव गगनाला भिडल्याने काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी चूल पेटवून आंदोलन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area