मुंबईत पावसाचा कहर, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे

                                           

मुंबई : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाचा मुंबईत अक्षरश: कहर सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह ठिकठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मुलुंड परिसरात भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Mulund West Wayde Chawl compound Wall collapsed)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम (Mulund West) परिसरातील कलपादेवी पाडा परिसरातील वायदे चाळीत ही घटना घडली आहे. काल रात्री 8 च्या सुमारास वायदे चाळीतील संरक्षक भिंत कोसळली. यात एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. दिलीप वर्मा (35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 

दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आज (18) आणि उद्या (19) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेत. यावेळी सोसायट्याचा वाराही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. विवार पूर्वमधील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल 160 ते 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area