मुंबईतील झिरकॉन को.ऑप. हाऊसिंग सोयासटीत तब्बल ६३ लाखांची वीजचोरी

 


 मुंबई

मुलुंड येथील वीजचोरीला निर्मल लाइफस्टाइल हा विकासकच सर्वस्वी जबाबदार आहे. त्यात सोसायटीचा कुठलाही संबंध नाही, असे झिरकॉन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीचे म्हणणे आहे.

महावितरणने मुलुंड पश्चिमेकडील या सोसायटीची तपासणी केली असता, ६३.२३ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले होते. या सोसायटीतील एकही फ्लॅटचा सदस्यांना ताबा मिळालेला नाही. या बांधकाम प्रकल्पाला विकासक निर्मल लाइफस्टाइल यांच्याकडून कमालीचा विलंब झाला आहे. त्याविरोधात खरेदीदारांनी 'रेरा'कडे धाव घेतली. तेथे तक्रार दाखल करण्यापूर्वी जेमतेम पाच महिनेआधी, जानेवारीतच सोसायटी स्थापन झाली आहे. त्याचवेळी संबंधित वीजचोरी विकासकाकडून इमारत बांधकामासाठी करण्यात आली असून, ती दोन वर्षांपासून सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी सोसायटी स्थापनच झालेली नव्हती. त्यामुळे या वीजचोरीशी सोसायटीचा कुठलाही संबंध नाही. यासंदर्भात महावितरण किंवा पोलिस यांपैकी कोणाकडूनही नोटीस आलेली नाही अथवा चौकशीदेखील झालेली नाही, असे झिरकॉन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीने म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area