दहिसरमध्ये सोन्याच्या दुकानात लूट, मालकाची गोळी झाडून हत्या, नांगरे पाटील घटनास्थळी

 

 मुंबई : सोन्याच्या दुकानात शिरुन ज्वेलर मालकाची हत्या (Dahisar Jewelry Shop owner Killed) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दहिसर भागात घडली आहे. ओम साईराज ज्वेलर्सचे (Om Sairaj Jewelers) 45 वर्षीय मालक शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा लुटारुंच्या गोळीबारात मृत्यू झाला. हत्येनंतर तिघेही जण दुकान लुटून पसार झाले. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Dahisar Jewelry Shop owner Killed by robbers)

नेमकं काय घडलं?

दहिसर पूर्व येथील रावळपाडा परिसरात गावडे नगर भागात बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. बंदुकीचा धाक दाखवून तिघे जण ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले. ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केला असता लुटारुंनी त्याच्यावर गोळी झाडली. यामध्ये शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज

हत्येनंतर दुकानात लूट करुन तिन्ही आरोपी पसार झाले. दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार झाले.

तिन्ही आरोपी एकाच बाईकवरुन आले होते. दुकानातील सोनं लुटल्यानंतर ते पसार झाले. मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area