Video: पोटात घुसलेला चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात, नागपूरच्या व्हिडीओनं महाराष्ट्र हादरला

नागपूर : नागपूरला महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ का म्हटलं जातं याचा पुरावा देणारी एक घटना घडली आहे. विदर्भातल्या ह्या मुख्य शहरात गुन्ह्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. त्यातच आता जी घटना उघडकीस आलीय ती पाहून संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. अशी घटना आणि दृश्यं दोन्ही विरळ मानावे लागतील. (nagpur Attempted murder By Friend he reached police Station With knief)

नेमकं घटना काय घडली आहे?

एक विशीतला तरुण मुलगा आहे, त्याच्या पोटात चाकू खुपसलेला दिसतोय. तो तशाच अवस्थेत एका पोलीस ठाण्यात आल्याचा व्हिडीओ महाराष्ट्रासह देशभरात वेगानं व्हायरल झाला. आधी हा व्हिडीओ उत्तर प्रदेश, बिहारकडचा असेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. पण हा व्हिडीओ नागपुरचा असल्याचं आता उघड झालं आहे. जो तरुण पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला त्याचं नाव विनय राबा असल्याचेही समजते. ही घटना नागपुरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यातली आहे. विनय राबाचा मित्रांसोबत वाद झाला. त्याच वादात त्याला मित्रांनी भोसकलं. पण सुदैवानं विनय वाचला. पण तशा अवस्थेत हॉस्पिटलला न जाता तो थेट पोलीस ठाण्यात आला. त्याच्या पोटात चाकू खुपसलेला होता, रक्तस्त्रावही होत होता. पोलीसही समोरचं दृश्य बघून चक्रावून गेले. विनय राबाची तक्रार पोलीसांनी नोंदवून घेतली आणि नंतर ते त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. याच घटनेत आणखी दोन मित्र जखमी झाल्याचीही माहिती आहे.

व्हिडीओत काय दिसतं आहे?

नागपूरच्या ह्या घटनेचा व्हिडीओ हा 43 सेकंदाचा आहे. यात एक वीस बावीस वर्षाचा तरुण पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत दिसतो आहे. त्याच्या कपाळावर जखमा झालेल्या आहेत. खुपसलेल्या चाकुला त्यानं हातानं धरलं आहे. रक्तस्त्रावानं त्याचं पाढरं शर्ट लाल झालेलं आहे. त्याच्या चेहऱ्यावरही कळा येताना दिसतायत. चाकूच्या वेदनेनं त्याला नीट चालताही येत नाही. त्याच्यासोबत आणखी एक तरुण आहे. बहुतेक तो त्याचा मित्र असावा. तो बाईक चालवतोय. त्याच बाईकवर हे दोघेही पोलीस ठाण्यात दाखल झालेत. कपिलनगर पोलीस ठाण्याची पाटीही व्हिडीओत दिसते आहे. ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर हे दोन्ही तरुण बाईकवरुनच बहुतेक हॉस्पिटलमध्ये जायला निघाले त्यावेळेस पोलीसांनी त्यांना त्यांच्या व्हॅनमध्ये बसवलं आणि बहुतेक हॉस्पिटलला नेलं असावं. व्हिडीओ व्हॅनमध्ये बसवण्यापर्यंतचाच आहे. 

click below link to watch video

https://twitter.com/i/status/1402080207402520576

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area