मुंबई :अंमली पदार्थ दलालांना टोल नाक्यावर बेड्या; एनसीबीची कारवाई

 

अंमली पदार्थांच्या दलालांना टोल नाक्यावरच बेड्या ठोकण्याची आगळी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बजावली आहे. त्यामध्ये बदलापूर व अंबरनाथच्या दोन दलालांना अटक करण्यात आली.

बदलापूर भागात सुनील भंडारी हा दलाल कुप्रसिद्ध आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीसह वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तपास संस्था सातत्याने त्याच्या मागावर होत्या. त्याअंतर्गतच एनसीबीचे मुंबईचे पथकदेखील क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली भंडारी याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यादरम्यान पुण्यातील टोलनाक्यावर सुनील भंडारी याची धरपकड करण्यात आली. यावेळी त्याच्यासह अमन गाडगे हादेखील होता. गाडगे हा अंबरनाथचा आहे.

समीर वानखेडे यांनी सांगितले की, 'संबंधित गाडीत पुढच्या आसनाखाली अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. तपास केला असता, तब्बल १२ किलो गांजा गाडीत आढळून आला. त्याची बाजारातील किंमत एक लाख रुपये आहे. सुनील भंडारी याच्याविरुद्ध अंमली पदार्थांसह हत्येचा प्रयत्न, खंडणी असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. याआधीदेखील त्याला अंमली पदार्थविरोधी गुन्ह्यात पकडण्यात आले होते. त्यावेळी ४० किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याची अटक महत्त्वाची ठरली आहे.'

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area