इकबाल कासकरच्या अडचणीत वाढ, एनसीबी 24 जूनला अटक करणार

 

मुंबई : ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे अधिकारी गुरुवारी (24 जून) इकबाल कासकर याचा ताबा घेणार आहेत. कासकर सध्या ठाणे जेलमध्ये आहे. एका मोठ्या ड्रग्स रॅकेटचा इकबाल कासकर याच्याशी संबंध असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 7 जणांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे. यापैकी दोन जण काश्मीर येथून हशीस आणायचे आणि मुंबईतील त्यांच्या साथीदारांना द्यायचे. यानंतर त्या हशीसची मुंबईत विक्री व्हायची (NCB will arrest Iqbal Kaskar tomorrow after some technical issues in Kashmir Mumbai drugs racket).

हशीस रॅकेटमध्ये आतापर्यंत कुणाकुणाला अटक?

पहिल्या कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांनी 7 जणांची चौकशी केली होती. ही कारवाई मुंबई आणि ठाणे भागात केली होती. यावेळी 17 किलो हशीस जप्त करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे साडेचार लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली होती. या कारवाईत कमलेश गुप्ता, अमित पटेल, राजविंदर सिंग, गुरमित सिंग, नूर मोहमद, शब्बीर शेख आणि निझमुद्दीन ताजा यांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी गुरमित सिंग आणि राजविंदर सिंग हे पंजाब ते मुंबई मोटार सायकलवरून प्रवास करायचे. यावेळी बॅगेतून हशीस आणायचे.

2 दिवसात 35 किलो हशीस आणि लाखो रुपयांची रोकड जप्त

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कारवाया करून सुमारे 2 दिवसात 35 किलो हशीस जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे लाखो रोख रक्कम जप्त केली होती. या तपासाचे धागेदोरे इकबाल कासकर याच्यापर्यंत पोहचले. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी इकबाल कासकर याचा ताबा मिळवण्यासाठी हालचाल सुरू केली. कोर्टाकडून इकबाल कासकर याच्या अटकेचं वॉरंट मिळवल्यानंतर आज (23 जून) एनसीबी अधिकारी यांनी इकबालचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इकबालचा ताबा मिळाला नाही. यामुळे एनसीबी अधिकारी गुरुवारी (24 जून) इकबाल कासकर याचा ताबा घेऊन त्याला अटक करणार आहेत.

इक्बाल कासकरवर कोणता आरोप?

इक्बाल कासकरवर एनसीबीनं जम्मू काश्मीरमधून पंजाबमध्ये 25 किलो ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. हे ड्रग्ज मुंबईत देखील विकण्यात आलं होतं. एनसीबीनं काश्मीरमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा तपास केला असता या कारवाईतून या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच संबंध असल्याचं उघड झालं. आता इकबाल कासकर याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इकबाल कासकर याचं अटक वॉरंट कोर्टाकडून मिळवल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area