नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांचा कारावास

                                                 

नांदेड : एनआयए विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 2012 मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी नेते आणि पत्रकारांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी 2012 मध्ये अटक झालेल्या तीन जणांना मंगळवारी येथील विशेष एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. (NIA Special Court Convicts Three Lashkar-e-Taiba Terrorists In 2012 Nanded Blast Case)अटकेतील दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

कोर्टाने मंगळवारी मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सदिक यांना यूएपीए कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. एनआयएनुसार अकरम रोजगाराच्या बहाण्याने सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्याच्या वेळी त्याची ओळख पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या विविध सदस्यांशी झाली.काय होता कट?

सौदीची राजधानी रियाद येथे नांदेड, हैदराबाद आणि बेंगळुरुसह भारतातील विविध भागांतील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या घडवण्याच्या उद्देशाने अकरमने आपल्या हँड्लरसह कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे एनआयएने कोर्टाला सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area