पंचगंगा नदीचे पाणी अजूनही पात्राबाहेर…

 

शनिवारी दिवसभरात काही काळ पावसाचा जोर ओसरल्याने राजाराम बंधार्‍याची पातळी 34 फुटांवर स्थिर आहे. पंचगंगा नदीचे पाणी (water) अजूनही पात्राबाहेर आहे. जिल्ह्यातील अजूनही 52 बंधारे पाण्याखाली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सततच्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालली होती.पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत किंचित घट झाली आहे. जिल्ह्यातील बंद असणारे वाहतुकीचे मार्ग पूर्ववत सुरू झाले आहेत.

हातकणंगलेत 27.6 मि.मी., शिरोळ 20.9, पन्हाळा 28.7, शाहूवाडी 34.9, राधानगरी 45.8, गगनबावडा 92, करवीर 28.4, कागल 28.6, गडहिंग्लज 33.6, भुदरगड 35.6, आजरा 54 व चंदगडला 57.7 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यातील बहुतांश धरणे अद्याप 30 ते 35 टक्क्यांपर्यंत भरली आहेत.  त्यामुळे धरणातून पाण्याचा (water)  विसर्ग होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area