‘मोदी-ठाकरेंच्या भेटीची चर्चा करतात त्यांचा अभ्यास कमी’, रोहित पवारांचा भाजपला टोला

 पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजधानी दिल्लीत एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्यावरुन राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र मोदी-ठाकरे यांच्या भेटीची जे चर्चा करतात त्यांचा अभ्यास कमी आहे आणि ही मुद्दाम केलेली चर्चा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्याशी संवाद साधला. एक पार्टी अशी आहे, तिला नेहमी असं वाटतं की आपण राज्यात आणि देशात सत्तेत राहावं, असा अंहकार नेहमी पाहायला मिळतो, अशा शब्दात रोहित पवार यांनी नाव न घेता भाजपवर जोरदार टीका केलीय. (MLA Rohit Pawar Criticizes BJP leaders in Maharashtra)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी एक मोलाचा सल्लाही दिलाय. चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्राची आणि राज्याची मजबुरी काय आहे. त्यावर विचार केला पाहिजे. चंद्रकांत पाटलांनी लोकांची सेवा केली पाहिजे, असा सल्ला रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना दिलाय. कार्यकर्ते हेच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. येत्या काळात नवीन आव्हान पेलण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष करुन तरुणांकडे आमचं लक्ष असेल, असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.

विरोधी पक्ष राज्याला मदतीसाठी केंद्राला कधी पत्र लिहणार?

राज्यातील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरण्यासंदर्भातला निर्णय भाजपचा अंतर्गत आहे. आता उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका आहे. त्यासाठी त्यांचं काय नियोजन असेल ते पाहावं लागेल. त्यांना मदत जाहीर होत असेल आणि महाराष्ट्राला मदत मिळत नसेल तर केंद्र सरकार नक्कीच राजकारण करत आहे, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यातबरोबर विरोधी पक्ष राज्याला मदतीसाठी केंद्राला कधी पत्र लिहणार? असा सवालही रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना केलाय.

ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतंत्र बसून चर्चा केली असं सांगण्यात आलं. त्यांनी काहीही करो, पण लगेच वेगळ्या शंका, वावड्या काही लोकांकडून उठवल्या गेल्या. त्याच्यावर यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. हा पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता त्यात शिवसेनाही आली आहे. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area