उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर….

 

राज्याच्या इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. जिल्ह्यात आजही दिवसाला जवळपास हजार ते दीड हजार नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर किमान तीस जणांचा मृत्यू होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या चिंताजनक परिस्थितीची दखल आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (political leader) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी घेतली आहे.

अजितदादा-आरोग्यमंत्री उपाययोजनांची माहिती घेणार

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तसंच प्रशासनाकडून राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते प्रशासकीय प्रमुखांसह लोकप्रतिनिधींनी सोबत ते बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे.

उद्याच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर भर

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आजही 15 टक्क्यांहून अधिक आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील तीन टक्क्यांपर्यंत आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लॉकडाऊनला कोल्हापूरकरांनी दिलेला संमिश्र प्रतिसाद, सुरुवातीच्या लक्षणांकडे केलेलं दुर्लक्ष, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची अपुरी यंत्रणा, टेस्टिंगचे वाढलेले प्रमाण, त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात उपचारासाठी येणारे रुग्ण, अशी काही कारण जिल्ह्यातील रुग्ण वाढीसाठी प्रथमदर्शनी दिसत आहेत

या व्यतिरिक्त काही त्रुटी राहत आहेत का किंवा या व्यतिरिक्त कोणती कारण असू शकतात याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने माहिती संकलनासाठी अधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याची देखील काहीशी अशीच परिस्थिती होती.. यावर मुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. या झाडाझडती नंतर मात्र साताऱ्यातील रुग्ण संख्या काहीशी कमी होतेय. याच पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात होत असलेली अजितदादांची बैठक किती परिणामकारक असेल हे काही दिवसातच कळेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area