कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी, महापालिका सहाय्यक आयुक्त दोन दिवसांपासून बेपत्ता

 

पालघर : वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव (Premsingh Jadhav) हे गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसिंग जाधव यांच्याकडे वसई विरार महापालिकेत मागील वर्षभरापासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा कुठेच पत्ता नाही. (Premsingh Jadhav Vasai virar municipal corporation Assistant Commissioner missing from 2 days)

प्रेमसिंग जाधव हे सहाय्यक आयुक्त पदावर रुजू झाल्यापासून त्यांनी वसई विरार शहरातील अनेक अनाधिकृत बांधकामं भुईसपाट केली. अनधिकृत बांधकामांवर थेट हातोडा उचलल्याने प्रेमसिंग जाधव हे चर्चेत होते.

प्रेमसिंग जाधव हे 2 जून रोजी कामावारुन सुटल्यानंतर ते घरी परत गेलेच नाहीत. उशीर झाल्यामुळे घरच्यांनी चौकशीला सुरुवात केली. मात्र त्यांचा पत्ताच नव्हता. याबाबत प्रेमसिंग जाधव बेपत्ता असल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

प्रेमसिंग जाधव अचानक बेपत्ता झाल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते बेपत्ता झाले की त्यांना बेपत्ता केलं गेलं अशी उलटसुलट चर्चा वसई विरार परिसरात रंगली आहे. पोलीसही त्या अनुशंगाने तपास करत आहेत.

नायगावतील इमारतीवर कारवाई

प्रेमसिंग जाधव यांनी काही दिवसापूर्वी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. नायगाव पश्चिमेला असलेल्या इमारतीवर हातोडा चालवला होता. 45 हजार स्क्वेअर फूटावर बांधकाम करण्यात आलं होतं. ते अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम जाधव यांनी केलं होतं. बनावट सीसी करुन लोकांना फसवल्याचा आरोप त्यांनी बिल्डरवर केला होता. दोन दिवस कारवाई करुन चार मजली इमारतीवर त्यांनी कारवाई केली होती.

कोण आहेत प्रेमसिंग जाधव? 

प्रेमसिंग जाधव हे वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेत

प्रेमसिंग जाधव यांच्याकडे कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी

सहाय्यक आयुक्त म्हणून वसई-विरारमध्ये बेधडक कामगिरी

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area