लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार, कॉन्स्टेबलला अटक

 

जयपूर : लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात ही घटना घडली. मित्राच्या घरी येणं-जाणं असल्यामुळे ओळखीचा गैरफायदा घेत पोलीस हवालदाराने दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. आरोपी पोलीस जयपूर पोलीस आयुक्तालयात तैनात आहे. (Rajasthan Crime News Police Constable allegedly Rapes Friend’s sister on pretext of marriage)

सहा वर्षांपासून पीडितेशी शारीरिक संबंध

आरोपी कॉन्स्टेबल संजय हा राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या त्याची पोस्टिंग जयपूरमध्ये पोलीस आयुक्तालयात होती. लग्नाच्या आमिषाने संजयने सहा वर्षांपासून पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा केला जात आहे. वर्दीचा धाक दाखवत त्याने पीडितेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जातं.कॉन्स्टेबल संजयला बेड्या

यासंदर्भात 26 मे 2021 रोजी पीडितेने पोलिसात तक्रार दिली. आपल्या भावाचा मित्र संजयने लग्नाचं आमिष दाखवत 6 वर्ष लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर दादिया पोलिसांनी झुंझनूतील हुकुमपुरा भागात राहणारा आरोपी कॉन्स्टेबल संजयला बेड्या ठोकल्या आहेत.

औरंगाबादच्या बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी केला होता. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कारासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने एकूण तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दुसरीकडे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area