‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा, पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’ अतुल भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन आता राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. भाजप युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवनावर फटकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांकडून काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तत्त्पूर्वी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे. (Atul Bhatkhalkar responds to Sanjay Raut’s criticism on Ram Mandir issue)

आमदार अतुल भातखळकर यांनी एका वृत्तपत्राची बातमी ट्वीट करुन शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. अयोध्येतील जमीनखरेदी व्यवहार पारदर्शक असल्याबाबत रामजन्मभूमी ट्रस्टकडून कराराचा सविस्तर तपशील जारी करण्यात आलाचं वृत्त भातखळकरांनी ट्वीट केलंय. ‘राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना, आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय.शिवसेना भवनासमोर राडा, भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area