कोरोना काळात भारतीयांनी सर्वात जास्त पैसे स्विस बँकेत टाकले, 13 वर्षांचा विक्रम मोडला

                                      

बसेल (स्विझर्लंड) : कोरोना काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठे झटके बसले, मात्र भारतातील श्रीमंतांवर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. कारण याच काळात अनेक भारतीय श्रीमंतांनी स्विस बँकेत मोठ्या प्रमाणात पैसे जमा केलेय. या पैशांची रक्कम इतकी आहे की मागील 13 वर्षांचा विक्रम मोडलाय. गुरुवारी (17 जून) स्विझर्लंडची केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत हे उघड झालंय. यानुसार 2020 मध्ये स्विस बँकेत (Swiss Banks) भारतीयांना आणि भारतीय कंपन्यांनी जवळपास 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत. ही रक्कम मागील 13 वर्षातील सर्वाधिक आहे (Record of Indians money amount deposited in Swiss bank broken in 2021 amid corona lockdown).

आकडेवारीनुसार, 2019 च्या अखेरीस स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांची रक्कम जवळपास 89.9 कोटी फ्रँक्स (6,625 कोटी रुपये) होती. 2020 च्या अखेरीस ही एकूण रक्कम वाढून 20,706 कोटी रुपये इतकी झाली. या रकमेत 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कस्टमर डिपॉजिट, 3100 कोटी रुपयांपेक्षा अधिक दुसऱ्या बँकांच्या माध्यमातून, 16.5 कोटी रुपये ट्रस्टच्या माध्यमातून आणि जवळपास 13,500 कोटी रुपये बॉन्ड, सिक्युरिटीज आणि वेगवेगळ्या आर्थिक पर्यायांशी संबंधित गोष्टींचा समावेश आहे.

2006 मध्ये नवा विक्रम

या आकडेवारीनुसार, भारतीयांनी स्विस बँकेत पैसे जमा करण्याचा याआधीचा विक्रम 2006 मध्ये झाला होता. त्यावेळी भारतीयांनी जवळपास 6.5 अब्ज स्विस फ्रँक्स जमा केले होते. असं असलं तरी 2011, 2013 आणि 2017 या वर्षांना सोडलं तर बहुतांश वर्षी यात घट झालीय.

स्विस बँकेकडून सर्व पैशांचा हिशोब

SNB ने दिलेल्या माहितीनुसार, स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेले पैसे व्यक्ती, बँका आणि एंटरप्रायजेसकडून जमा करण्यात आलेत. ही रक्कम स्विझर्लंडमधील भारतीयांच्या काळ्या पैशाची नाहीये. यात भारतीय, एनआरआय किंवा इतर लोकांचं थर्ड कंट्री एंटिटीजच्या नावाने जमा होणाऱ्या पैशाचा समावेश नाहीये.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area