कोल्हापुरात संचारबंदी कायम, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनलॉक नियमावलीमध्ये कोल्हापुरात संचारबंदी (restriction) कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिम व सलून या सेवा शनिवारी आणि रविवारी बंद राहतील. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई पास घ्यावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.

हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू राहणार आहे. सलून आणि जिम पन्नास टक्के आसन क्षमतेवर सुरू ठेवता येणार आहे; मात्र त्यात एसी वापरण्यास बंदी (restriction) आहे. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ दरम्यान सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. ७ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत हीच नियमावली राहील, असेही आदेशात म्हटले आहे.


हे सुरू

 • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत सुरू
 • वृत्तपत्रे, त्यांचे वितरण सुरूच राहणार
 • हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू
 • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ सुरू राहतील, तर शनिवारी, रविवारी बंद.
 • शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालयात फक्त २५ टक्के उपस्थिती
 • फक्त खुल्या मैदानावरील सराव सोमवार ते शुक्रवार दरम्यान पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेतच
 • राजकीय किंवा इतर बैठकांसाठी ५० टक्के क्षमतेची अट
 • कृषी कामे सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील
 • सलून आणि जिम ५० टक्के क्षमता सुरू राहील; पण एसीचा वापर नाही. (सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत)
 • बससेवा ५० टक्के आसन क्षमतेने सुरू
 • लग्न २५ लोकांच्या उपस्थितीतच
 • फक्त २० लोकांची उपस्थिती बंधनकारक
 • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू
 • कामगार निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणीच बांधकामे

या सेवा बंद

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने,  सिनेमागृह, मॉल सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम संचारबंदीचे नियम लागू राहतील

स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी तसेच गर्दी होणार नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण फक्त सोमवार ते शुक्रवार दरम्यान, तसेच सायंकाळी पाचनंतर. (बाहेरचा प्रवास नाही.)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area