अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणं भोवलं, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालकासह चौघांवर आरोपपत्र

 

सोलापूर: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालक डॉ. राजाराम कोकरे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी चौकशी केल्यानंतरर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. (Solapur Police submit Charge sheet against Rajaram Kokare and other three peoples regarding malpractice in exam of Punyashlok Ahilyadevi Holkar University)

25 जूनला पुढील सुनावणी

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणाची पहिली सुनावणी 22 मार्चला झाली होती. पुढील सुनावणी आता 25 जून रोजी होणार आहे. डॉ. कोकणे यांच्यासह यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, सुविधा समन्वय हसन शेख , प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

पैसे घेऊन गुण वाढ केल्याचा आरोप

डॉ. कोकणे यांच्यासह यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, सुविधा समन्वय हसन शेख , प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड यांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपींवर पैसे घेऊन गुणवाढ करणे कुलगुरूंचा पासवर्ड हॅक करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

2020 मध्ये प्रकरण उघडकीस

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचं प्रकरण 2020 मध्ये उघडकीस आलं होतं. त्यावेळी आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये खळबळ उडाली होती. सिनेट सदस्यांनी देखील याबाबात आक्रमक भूमिका घेतली होती. यासंबंधीचं एक प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

विद्यापीठ विद्यार्थ्यांचं हित पाहून परीक्षा फी परत करणार

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित पाहून परीक्षा फी 35 लाख  दिले महाविद्यालयाकडे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 19.26 टक्के शुल्क माफ केले आहे. विद्यापीठाच्या योजनेचा वीस हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. 35 लाख रुपये इतकी रक्कम महाविद्यालयाकडे विद्यापीठाने वर्ग केली. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पैसे फीचे पैसे परत मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area