तीन महिन्यात 2 कोटी, दोन दिवसात 25 लाखांची दारू पकडली, जलमार्गाने दारूची तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही

 

मुंबई : मुंबईत किंवा इतर ठिकाणी अवैध दारूची तस्करी करण्यासाठी जलमार्गाचा अधिकाधिक वापर करत असलेल्या दारू माफियांची आता खैर नाही. कारण अशा दारू माफियांवर धडक कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आता बोट दिली जाणार आहे. त्यामुळे समुद्राच्या आजुबाजूला किंवा खाडी लागत अनधिकृत दारू वाहतूक किंवा निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करणं सोपा होणार आहे (State excise officials seize disillicit liquor worth Rs 25 lakh in two days).

दोन दिवसात 25 लाखांची दारु पकडली

विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना बोटी देण्यास सुरुवातही झाली आहे. मुंबईलगत ठाणेच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आठ पेट्रोलिंग बोट देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत ठाणे उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 25 लाख रुपयांची दारू पकडली असून 15 तस्करांना अटक केली आहे (State excise officials seize disillicit liquor worth Rs 25 lakh in two days).

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आठ बोटी आणि एक ड्रोन सुपूर्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी ठाणे खाडीमार्गे दारूच्या तस्करांवर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. डोंबिवली, देसाई आणि मुंब्रा खाडी येथे दारू तयार करणाऱ्यांवर स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग आधीपासूनच कारवाई करत होते. या संदर्भात कांतिलाल उमप यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याशी ठाणे खाडीतील गस्तीविषयी चर्चा केली. त्यानंतर 20 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी खाडीत पेट्रोलिंगसाठी आठ बोटी आणि एक ड्रोन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द केला.

तीन महिन्यात 2 कोटींची दारु पकडली

राज्य उत्पादन शुल्काने 8 आणि 9 जून रोजी एकूण 25 लाख 24 हजार किंमतीची दारू जप्त केली. यामध्ये विदेशी दारू, देशी दारू आणि रसायनेही जप्त करण्यात आले आहेत. तसेच 15 जणांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 मार्च 2021 ते 11 जून 2021 पर्यंत एकूण 708 गुन्हे दाखल झाले आणि 409 दारू तस्करांना अटक केली. तर 2 कोटींची दारू जप्त केली. समुद्राच्या आजुबाजूलगत असलेल्या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू निर्मिती आणि तस्करी केली जाते. या परिसरात बोटच्या माध्यमातून पेट्रोलिंग करत जर सतत कारवाई सुरू ठेवली तर अवैध दारू माफियांना नक्कीच चोप बसणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area