रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी

 

बदलापूर : मुंबईलगतच्या बदलापूर भागात रॉयल एनफिल्डच्या शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली. सोमवारी मध्यरात्री ही चोरी झाली. चोरट्यांनी आयपॅड, मोबाईल, टीशर्ट आणि जॅकेट असा मुद्देमाल लंपास केला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे. (Thane Badlapur Royal Enfield Bike Showroom Robbery)

बदलापूरच्या कात्रप परिसरातील हायवेवर रॉयल एनफिल्ड ही दुचाकींची शोरुम आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक चोरटा या शोरुममध्ये शटर वाकवून घुसला. त्याने शोरुममधील तीन आयपॅड, एक मोबाईल, टीशर्ट आणि जॅकेट असा मुद्देमाल चोरुन नेला.चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे. सकाळी ही घटना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. दुकानाचे वाकलेले शटर पाहून त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.वाहत्या रस्त्यावरील शोरुम

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शोरुम कल्याण-कर्जत राज्य महामार्ग या मुख्य रस्त्यावर असून रात्री उशिरासुद्धा या रस्त्यावरुन वाहतूक सुरु असते. मात्र तरीही चोरट्यांनी केलेली हिंमत पाहता इतर दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

कुख्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड

दुसरीकडे, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा तीनने  सोमवारी रात्री सापळा रचून देशभर धुमाकूळ घातलेल्या आणि गोडासन या आंतरराष्ट्रीय चोरी आणि दरोड्यासाठी कुख्यात असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. ही टोळी भिकाऱ्याचा वेशात दुकानाबाहेर रेकी करायची. नंतर मध्यरात्री दरोडा टाकायची.

टोळी नालासोपाऱ्यातील संतोष भुवन या परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (14 जून) रात्री 12 च्या सुमारास सापळा रचत या टोळीला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मिरची पावडर, कटावन्या, कोयते जप्त केले आहेत. पण या टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area