अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षे कारावास

कोल्हापूर: मोहम्मद रफीक शेख (वय ५४) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवले. त्याला २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.

शहरातील शेखने ओळखीचा फायदा घेत ३० सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी संबंधित मुलीस घरी बोलवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. नागरिकांनी पीडित मुलीची सुटका केली. शेखला पोलिसांच्या ताब्यात

दिले होते. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास एम. आर. मोरे यांनी केला. त्यानंतर दोषारोपत्र दाखल झाले. खटल्याचे काम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी बाजू मांडली. न्यायलयाने शेखला दोषी ठरवले. त्याला २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.. सरकार पक्षाला पोलिस निरीक्षक प्रमोट जाधव, पोलिस नाईक जे. एस. खाडे हरिष सूर्यवंशी यांचे सहकार्य मिळाले.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area