Video | मांस फस्त करण्यासाठी वाघांची धडपड, हवेत झेप घेताच थेट पाण्यात पडले, पाहा व्हायरल व्हिडीओ

 

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तर काही व्हिडीओ पक्ष्यांचे असतात. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असल्यामुळे ते चर्चेचाही विषय ठरतात. सध्या वाघांचा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मांसाच्या हव्यासापोटी वाघांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसते आहे. (Tiger jumps to catch meat video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ काही वाघ दिसत आहेत. हे वाघ जिथे उभे आहेत त्या परिसरात पाणी दिसते आहे. तसेच सर्व वाघांच्या समोर हवेत मांसाचा एक तुकडासुद्धा लटकतो आहे. समोर लुसलुशीत मांस दिसत असल्यामुळे सर्व वाघांची भूक चाळवली गेली आहे. हे सर्व वाघ लटकलेले मास फस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते थेट हवेत झेप घेताना दिसतायत.

मांस फस्त करण्यासाठी वाघांची हवेत उडी

व्हिडीओमध्ये चार वाघांनी एकापाठोपाठ एक मांसाच्या तुकड्यावर झेप घेतली आहे. मात्र, झेप घेताच लटकलेला मांसाचा तुकडा वर जाताना दिसतोय. तसेच हवेत उडी घेतल्यानंतर ते लगेच पाण्यात पडत आहेत. नंतर पुन्हा हे वाघ पाण्याच्या वर येऊन पुन्हा लटकलेल्या मांसाला पकडण्यासाठी हवेत झेप घेत आहेत. मात्र वाघांचे एवढे सारे प्रयत्न फोल ठऱत आहेत. तसेच मोठी झेप घेऊनसुद्धा या वाघांना मांस खायला मिळत नाही.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खूश झाले असून मजेदार कमेंट्स करत आहेत.

click below link to watch video

https://twitter.com/i/status/1409050422539538436

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area