Video | पिंजऱ्यात डांबून जंगलात आणलं, बाहेर आल्यानंतर वाघाने काय केलं ? एकदा पाहाच

 

मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. वाघ, बिबट्यांसारखे हिंस्र प्राणी आता मानवी वस्तीत घुसत आहेत. सध्या अशाच मानवी वस्तीत शिरलेल्या खतरनाक वाघाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाघाला रेस्क्यू केल्यानंतर त्याला पुन्हा मुक्त करताना दाखवण्यात आले आहे. कैद केल्यामुळे त्याला आलेला राग या व्हिडीओमध्ये पाहण्यासारखा आहे. (Tiger rescued from Bihar realised in Champaran reserve park angry tiger video went viral on social media)

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओतील वाघाला बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी येथून रेस्क्यू करण्यात आले आहे. नंतर या वाघाला वाल्मिकी टायगर रिझर्व्हमध्ये सोडण्यात आले.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अतिशय रागावलेला वाघ एका पिंजऱ्यात कैद असल्याचे दिसतेय. हा वाघ पिंजऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी तळमळतोय. कधी एकदा बाहेर जाऊ असे त्याला झाले आहे. विशेष म्हणजे जंगलात राजासारखा थाट असलेल्या वाघाला पिंजऱ्यात शेळीसारखं राहावं लागत असल्यामुळे तो जास्तच खवळला आहे. त्याच्या समोर कोणी गेल्यास एका सेकंदात समोरच्या व्यक्तीचा तो फडशा पाडेल एवढा त्याला राग आला आहे.

वाघाची बाहेर पडण्यासाठी तळमळ

व्हिडीओमध्ये वाघाला कैद केलेले दिसत असले तरी मुळात त्याला सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे. त्याला चंपारण जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या वाल्मिकी टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये सोडण्यात येत आहे. हा वाघ बाहेर पडण्यासाठी तळमळत असताना अचानकपणे वन कर्मचाऱ्यांनी व्हिडीओतील पिंजरा खुला केला आहे. त्यानंतर थोडी मोकळी जागा मिळाल्याचे दिसताच हा वाघ पिंजऱ्याच्या बाहेर पडला आहे.

click below link to watch video

https://twitter.com/i/status/1405771246436974599

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area