Video | नळाच्या पाण्याखाली राजेशाही थाट, ठुमकत ठुमकत कासवाची शाही अंघोळ

 सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. समाजमाध्यमांवर चर्चेत येणारे जास्तीत जास्त व्हिडीओ हे प्राण्यांशी निगडीत असतात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या करामती, त्यांनी केलेली अफलातून कामगिरी यामुळे हे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका कासवाचा (Tortoise) व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू फुटलं असून त्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. कासवाचा अंघोळ करतानाचा राजेशाही थाट तसेच कासवाने मारलेले ठुमके (dancing) हे पाहण्यासारखे आहेत. (Tortoise dancing happily while bath video goes viral on social media)

नळाखाली कासवाचे ठुमके

या व्हिडीओमध्ये एक कासव पाण्याच्या नळाखाली अंघोळ करतो आहे. अंघोळ करताना तो चांगलाच खुश झाल्याचे दिसतेय. पाण्याच्या प्रवाहाखाली थांबल्यामुळे त्याला थंडगार वाटत असावे. याच कारणामुळे हा कासव हर्षोल्हासाने डान्स करतो आहे. पाण्याच्या नळाखाली उभं राहून तो मजेदार ठुमके मारतोय. या कासवाचा हा उत्स्फूर्त डान्स नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना चांगलाच आनंद झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका ट्विटर युजरने कासवाला नळाच्या पाण्याखाली पाहून टिप टिप टिप बरसा पाणी… पाणीने आग लगाई अशी खट्याळ कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने लहान मुलेसुद्धा अंघोळ करताना असेच ठुमकतात, असे म्हटले आहे.

Click below link to watch video

https://twitter.com/AnimalsWorId/status/1401324253304090625

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area