नातेवाईकासोबत प्रेम प्रकरणाचा राग, भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या

 

लखनौ : बहिणीच्या प्रेम प्रकरणामुळे नाराज असलेल्या भावाने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेदम मारहाण करुन गळा दाबून भावाने बहिणीचा जीव घेतला. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याविषयी माहिती देण्याऐवजी गुपचूप तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती, मात्र पोलिसांनी आरोपी भावाला बेड्या ठोकल्या असून तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (Uttar Pradesh Crime News Brother killed Sister for having affair with relative)

अल्पवयीन तरुणीवर कुटुंबाचा दबाव

उत्तर प्रदेशातील बिजनौर शहरातील नगीना भागात हा प्रकार घडला. संबंधित तरुणी अल्पवयीन होती. तिचे एका नातेवाईकासोबत काही काळापासून प्रेमसंबंध सुरु होते. याची कुणकुण लागल्यामुळे तिचे कुटुंबीय आणि विशेष म्हणजे तिचा भाऊ अत्यंत नाराज होता. हे नातेसंबंध तोडण्याविषयी भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्यावर अनेकदा दबाव आणला. परंतु ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

मारहाण करुन गळा आवळला

दोन दिवसांपूर्वी बहीण-भावात या कारणावरुन पुन्हा एकदा वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या भावाने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. यामुळे कुटुंबात एकच खळबळ उडाली. अखेर मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी नातेवाईकांनी तिचे पार्थिव लपून छपून दफन करण्याची तयारी सुरु केली.

गुपचूप अंत्यसंस्काराची तयारी

नातेवाईकांनी सकाळीच कबरस्तानाच कबर खोदण्यास सुरुवात केली, मात्र इतक्यात पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन युवतीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपी भाऊ सारिकला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाईलाजाने हत्या, भावाची कबुली

माझ्या बहिणीचे नातेवाईकासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. मी अनेकदा समजवूनही तिने ऐकलं नाही. त्यामुळे नाईलाजाने मला हे पाऊल उचलावं लागलं, अशी कबुली भावाने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area