लॉकडाऊनमध्ये फिरताना पोलिसांनी हटकलं, पठ्ठ्या म्हणतो, माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय

 बंगळुरु : लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्यासाठी अनेक जण वेगवेगळी कारणं शोधताना दिसतात. कोणी दूध-भाजीपाला आणायला जात असल्याचं सांगतं, तर कोणी अत्यावश्यक सेवेत असल्याचं म्हणतं. खोटी कारणं देऊन फिरणाऱ्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याचं उत्तर ऐकून तुम्हीही खो-खो हसाल (Viral Video of Karnataka Man says his Hen has Stomach Ache)

नेमकं काय घडलं?

कर्नाटकमधील गडग जिल्ह्यात घडलेल्या या गंमतीशीर प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरण्यावरुन टोकत पोलिसांनी एका व्यक्तीला अडवले. त्याने सांगितले कारण ऐकून पोलिसांनाही हसू आवरेना. या माणसाने दिलेली सबब कोणाकडून पडताळून घ्यावी, असा प्रश्नच पोलिसांना पडला.

कोंबडीच्या पोटात दुखतंय, डॉक्टरकडे नेतोय

माझ्या कोंबडीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन चाललो आहे, असं भन्नाट उत्तर या व्यक्तीने दिलं. पोलिसांना खरं तर त्याला कठोर शिक्षा द्यायची होती. अगदी त्याला कोंबडा बनवण्याचीही इच्छा झाली असावी, मात्र त्याचं कोंबडी पुराण ऐकून पोलिसांची हसता पुरेवाट झाली. अखेर, या कोंबडीवर घरातच उपचार कर असं सांगून पोलिसांनी त्याला पुन्हा घरी पिटाळलं

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area