एक्स बॉयफ्रेण्डशी बोलल्याचा राग, अल्पवयीन मुलीला प्रियकराने विहिरीत ढकलून ठार मारलं

 

वर्धा : दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याच्या रागातून एखा पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रियकराने विहिरीत ढकलून हत्या केलीये. घटनेच्या चार ते पाच दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला असून गुन्हेगार प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यातील आर्वीमध्ये ही घटना घडलीय (Wardha Boyfriend Killed Minor Girlfriend Because She Talked With Her Ex Boyfriend).

पूर्वीच्या प्रियकरासोबत बोलत असल्याचा राग

अजय आत्राम असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे. त्याचं आर्वी शहरातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण होत. 23 जूनला प्रियकराने रात्री दोन वाजताच्या सुमारास मुलीला भेटायला बोलावले. प्रियकर आणि मुलगी दोघेही भेटले. दरम्यान दोघांमध्ये मुलीच्या पूर्वीच्या प्रियकरासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन वाद झाला. त्यावेळी प्रियकराने अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून तिची हत्या केली.

प्रथमदर्शी आत्महत्येचा अंदाज

रात्री झोपेतून उठलेल्या आईला मुलगी घरात न दिसल्याने तिने याची माहिती वडिलांना दिली. रात्रीच मुलीचा शोधाशोध सुरु झाला. मुलगी मिळाली नाही, मात्र तिचा दुपट्टा विहिरीजवळ दिसून आला. यामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आटमहत्या केली असावी असा अंदाज लावण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ गीठलं आणि मुलीचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रेमप्रकरणाचा छोटासा धागा पोलिसांच्या हाती आणि गुन्हेगार ताब्यात

या घटनेचा तपास सुरु असतानाच पोलिसांना मुलीच्या नोटबुकमध्ये काही प्रेमसंबंधीचा मजकूर, एका मुलाचे नाव आणि एक मोबाईलनंबर आढळला. या आधारे पोलिसांनी तीन लोकांना विचारपूस करण्याकरता ताब्यात घेतले. यातीलच एक अजय आत्राम याने हत्या केल्याची कबुली दिली.

सोबतच त्याने मुलीसोबत प्रेमसंबंध असून ती जुन्या प्रियकरासोबत बोलत असल्याने हे त्याला आवडत नव्हते म्हणून त्याने हत्या केल्याची कबुली दिलीय. प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेच्या चार ते पाच दिवसांनी घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी प्रेमप्रकरणाचा छोटासा धागा पकडून गुन्हेगार शोधत त्यास अटक केलीय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area