रस्ता ओलांडण्यासाठी तरुण आला, पण अचानक ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

 सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणार व्हिडीओ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मात्र, अपघाताच्या व्हिडीओंची नेटकरी विशेषत्वाने दखल घेतात. सध्या अशाच प्रकारचा एक गंभीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जे घडलंय आहे, ते आश्चर्यकारक आहे. (young Man cross road for save little Girl video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

रस्त्यावर चालत असताना कधी काय होईल हे सांगता येत नाही. साधेपणाने चालत असताना गंभीर अपघात झाल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. या व्हिडीओमध्येसुद्धा असंच काहीसं झालं आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि एक मुलगी रस्ता ओलांडण्यासाठी आलेले दिसतायंत. ते रस्त्यावर उभे राहून वाहने संपण्याची वाट पाहात आहेत. वाहने संपल्यांतर ते रस्ता ओलांडणार असल्याचे दिसतेय. मात्र, याच वेळी उभ्या असलेल्या तरुणाच्या समोरून एक छोटी मुलगी रस्ता ओलांडत आहे.

तरुण छोट्या मुलीकडे झेपावला

या व्हिडीओमध्ये कोणत्याही वाहनांचा विचार न करता छोटी मुलगी रस्ता ओलांडत असल्याचे दिसतेय. हा सर्व प्रकार छोट्या मुलीच्या समोर उभा असलेल्या तरुणाच्या लक्षात आला आहे. समोरुन छोटी मुलगी येत असल्याचे दिसताच तरुणाने धाडस दावखून मुलीकडे झेप घेतली आहे. छोट्या मुलीकडे वेगाने वाहन येत असल्यामुळे तरुणाने जीवाची पर्वा न करता समोरच्या छोट्या मुलीला उचलले आहे. तरुणाच्या सतर्कतेमुळे व्हिडीओतील छोट्या मुलीचे प्राण वाचले आहेत.\

Click below link to watch video

https://twitter.com/RexChapman/status/1400873911005310983

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area