तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव

 

नागपूर: यूट्युब पाहून बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न नागपुरातील एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने बॉम्ब (Bomb) तयार करण्याच्या नादात काहीतरी अर्धवट तयार केले. मात्र, हे स्फोटक निकामी होत नसल्याने या तरुणाने अखेर थेट पोलीस ठाण्यातच धाव घेतली. (Youth making explosive and rush to police station to defuse it in Nagpur)नागपुरातील नंदनवन पोलीस स्थानकात हा तरुण स्फोटक पदार्थ असलेली बॅग घेऊन आला. सुरुवातीला त्याने आपल्याला ही बॅग रस्त्यात सापडल्याची बतावणी केली. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावून बॅगमधील स्फोटकसदृश वस्तूची तपासणी केली.

नंदनवन पोलीस ठाण्यात शनिवारी हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. अद्याप पोलिसांनी या घटनेविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area