Video | शिक्षा द्यायला आलेल्या आर्या मॅडमच्या तालावर ‘देवमाणसा’चे ठुमके, पाहा आर्या-डॉ.अजितकुमारचा धमाल डान्स

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय. कारण, या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. इतकेच नव्हे तर, मालिकेत आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. यातच आता मालिकेत आणखी एका नव्या पत्राचे आगमन झाले आहे (Zee Marathi Devmanus Fame Actor Kiran Gaikwad and Sonali Patil dance video).

आता मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. ‘वैजू नं 1’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटील आता ‘देवमाणूस’ या मालिकेत काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सध्या आर्या सरकारी वकील असल्याचं दिसतंय.

ऑनस्क्रीन जरी आर्या डॉक्टर अजितकुमार देवला शिक्षा द्यायला आली असली, तरी ऑफ स्क्रीन मात्र या दोघांची धमाल मस्ती सुरु आहे. देवीसिंगला फाशीपर्यंत पोहचवायला आलेल्या आर्या मॅडमच्या तालावर चक्क त्याने ठेका धरला आहे. हा डान्स व्हिडीओ अभिनेत्री सोनाली पाटील हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

click below to watch video

https://www.instagram.com/reel/CQAXD-dDcYZ/?utm_source=ig_embed&ig_rid=982904d3-d925-40ee-a673-1833afcd0128

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area