तरुणीसह दोघा मित्रांना मारहाण, कल्याणमध्ये रिक्षा चालकासह 11 जणांना अटक
कल्याण : कल्याणमध्ये एका युवतीसह दोघा तरुणांना मारहाण केल्या प्रकरणी रिक्षा चालकासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलीस 11 आरोपींना कल्याण कोर्टात हजर करणार आहे. रिक्षाचालकाने छेड काढल्यानंतर तरुणीने मदतीसाठी दोघा मित्रांना बोलावले, मात्र जमावाने या तिघांनाच बेदम मारहाण केली होती. शुक्रवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Kalyan Girl and two friends beaten up by mob after fight with rickshaw driver 11 arrested)

नेमकं प्रकरण काय?

संबंधित तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तिची छेड काढली. यानंतर तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने एका ठिकाणी येण्यास सांगितले. तिचे दोन्ही मित्र कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात पोहोचलो. यावेळी त्यांचा रिक्षाचालकाशी वाद झाला.

वादावादी सुरु असताना उपस्थित जमावाने तरुणीसह तिच्या दोघा मित्रांनाच मारहाण सुरु केली. पट्ट्याने तिघांनाही बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आला. गैरसमजातून ही मारहाण झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर रिक्षा चालकासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area